---Advertisement---

मालेगावातील स्मशानभूमीमध्ये महिलेची अस्थी गायब, राखेवर अघोरी कृत्याचा प्रकार, नातलगांसह परिसरात खळबळ

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२५ । मालेगाव शहरातील संगमेश्वर स्मशानभूमीमध्ये अघोरी कृत्य झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वृद्ध महिलेच्या सरणावरील राख बाजूला करून अज्ञातांनी तिच्या अस्थी गायब केल्या आहेत. राखेवर लिंबू, खिळे, कुंकू आदी साहित्य आढळून आले. याप्रकरणी मालेगाव कॅम्प पोलिसांनी पंचनामा केला असून, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

येथील शरदनगरातील जमुनाबाई (जमनाबाई) बापू पाटील या वयोवृद्ध महिलेचे १५ मार्चला निधन झाल्याने तिच्यावर त्याच दिवशी श्रीरामनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या मृत महिलेचे नातलग परंपरेप्रमाण तिसन्या दिवशी म्हणजे सोमवारी (दि. १७) सकाळी अस्थी विसर्जनासाठी गेले असता त्यांना एक अघोरी प्रकार पाहावयास मिळाला.

यावेळी सदर अस्थींवर एक कोहळासदृश फळ ठेवलेले आढळून आले. या फळाला तीन लिंबू लावण्यात येऊन त्यावर लोखंडी नागफणी खोचलेल्या आढळून आल्या. त्यामुळे परिसरासह नातलगांमध्ये एकच खळबळ उडाली. मृत महिलेच्या नातलगांनी याची माहिती कॅम्प पोलिसांना दिल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सदर घटनेचा पंचनामा केला.

याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अघोरी विद्येच्या साहाय्याने गुप्तधन शोधणे, नरबळी देणे, पैशाचा पाऊस पाडणे, अघोरी उपाय करून रुग्णांवर उपचार करणे किंवा भानामती करणे असे अंधश्रद्धेचे प्रकार आपण नेहमी ऐकतो, वाचतो. त्याच्यातीलच हा प्रकार असल्याची चर्चा परिसरात आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---