---Advertisement---

चांदवड : पाय घसरून विहिरीत पडल्याने युवकाचा मृत्यू

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिकमधील चांदवड तालुक्यातील शिंदे येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. ज्यात पाय घसरून विहिरीत पडल्याने युवकाचा मृत्यू झाला. स्वप्नील सुभाष शिंदे (वय २०) असं मयत तरुणाचं नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केलं जात आहे.

शिंदे येथील स्वप्नील सुभाष शिंदे हा शेतातील विहिरीवरील विद्युत पंप चालू करण्यासाठी गेला होता. स्वप्निल विद्युत पंपाचा पाइप बसवत असताना अचानक पाइप तुटला. तुटलेला, पाइप धरण्याच्या प्रयत्नात स्वप्निल हा पाय घसरून विहिरीत पडून पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना घरातील कुटुंबीयांना कळताच त्यांनी तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने स्वप्निल यास विहिरीबाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत म्हणून घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला. या घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---