---Advertisement---

‘हॅप्पी होली’ म्हणत स्वच्छता गृहातील कर्मचाऱ्याला दिलं पेटवून ; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२५ । नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात नाशिकच्या ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात एका मद्यपी तरुणाने स्वच्छता गृहातील कर्मचाऱ्याला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार घडला. यात विजय इलमचंद गेहलोत (५४, रा. देवळाली कॅम्प) हे ६० टक्के भाजले गेले आहे. याप्रकणी संशयित शुभम जगताप याला सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने ‘हॅप्पी होली म्हणत मीच पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले’ अशा शब्दांत कबुली दिली.

मात्र, बस स्थानकात सीसीटीव्ही ऑपरेटर नसल्यामुळे तपासाला अडथळ येत आहे. या प्रकरणी आरोपीचा शोध सुरू आहे. नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकात विजय सफाईचे काम करत होता. या दरम्यान, आरोपी शुभम त्या ठिकाणी आला. त्याने मद्यपीला हटकले. या ठिकाणी पुन्हा येऊ नकोस असं स्वच्छता कर्मचारी मद्यपी व्यक्तीला म्हणाला.

या नंतर शुभमला राग आला. रागाच्या भरात त्याने विजयच्या अंगावर पेट्रोल ओतले. तसेच विजयला “हॅपी होली” म्हणून शुभेच्छा दिल्या आणि आग लावली. या आगीत विजय होरपळला. तेथील काही लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. या आगीत विजय ६० टक्के भाजला गेल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरूवात केली. बस स्थानकातील सीसीटीव्ही ऑपरेटर बिघडल्यामुळे पोलिसांना तपास घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. या प्रकरणी आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---