---Advertisement---

Nashik : लाखाच्या घरात पगार, तरी मागितली लाच ; उपवनसंरक्षक एसीबीच्या जाळ्यात

lach
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । लाचखोरीची एक मोठी बातमी नाशिकमधून समोर आलीय. व सादडाच्या लाकडांनी भरलेले पिकअप पकडले असता ते सोडवण्याकरिता एक लाख रुपये महिना वेतन असलेला उपवनसंरक्षक अधिकारी वर्ग १ एसीएफ शिरीषकुमार सजन निरभवणे (५४) ) याने १० हजार रुपये लाचेची मागणी करत ती वनपाल सुरेश कारभारी चौधरी यांच्या हस्ते स्वीकारली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात विरोधात वाडीव-हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत असे की, तक्रारदाराने या प्रकरणातील साक्षीदाराच्या शेतातील जांभळाचे व सादडाचे जुन्या वाळलेल्या झाडांची लाकडे पिकअपमधून (एमएच ०४ एएस ८०७७) गोंदे येथील पेपर मिल येथे विक्रीसाठी आणले असता, वनविभागाचे एसीएफ निरभवणे, वनपाल सुरेश चौधरी व कावेरी पाटील यांनी पिकअप पकडून मेरी-म्हसरूळ येथे गेल्या ३१ जानेवारी रोजी जमा केले होती.

सदर वाहन मालासह सोडविण्यासाठी निरभवणे याने वनपाल सुरेश चौधरी याच्यामार्फत दोन हजार दंड व लाच म्हणून दहा हजारांची मागणी केली होती. पुढे तक्रारदाराने हा संपूर्ण प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कथन केल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार चौधरी याच्याकडे दोन हजार रुपये दंडाची रक्कम आणि दहा हजारांची लाच सुपूर्द करण्यात आली.

त्यानंतर चौधरी यास पंचांसमक्ष निरभवणेला फोन करण्यास सांगून दहा हजार मिळाल्याचे कळविण्यात आले. निरभवणे यानेदेखील त्यास होकार देत गाडीची ऑर्डर घ्यायला पाठवून दे, असे फोनवर सांगितले. दरम्यान, फोनवरील या वार्तालापावरून चौधरी व निरभवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---