---Advertisement---

दुर्दैवी ! नाशिकमध्ये 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२५ । नाशिक शहरात रस्ते अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालले असून याच दरम्यान इंदिरानगर रोडवर झालेल्या अपघातात दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. वेदांत गुरसळकर असं मयत विद्यार्थ्याचे नाव असून सदर घटनेमुळे वेदांतच्या मित्र परिवारामध्ये आणि नाशिक शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेबाबत असे की, वेदांत हा वडाळा-पाथर्डी रोडवरील वज्रभूमी रो हाऊसमध्ये राहत होता. वेदांतचे वडील हे राज्य परिवहन महामंडळात कार्यरत आहे. तर आई गृहिणी आहे. वेदांत हा शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास पाथर्डी गावाकडून इंदिरानगरकडे त्याच्या दुचाकीवरून जात होता. वेदांत हा भरधाव वेगाने गाडी चालवत होता. त्यावेळी त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि त्याची दुचाकी थेट शेजारी असलेल्या पाणीपुरीच्या गाडीवर जाऊन आदळली.

प्रसंगी पणीपुरच्या गाडीचा पत्रा वेदांतच्या गळ्याला लागला आणि गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला.स्थानिक नागरिकांनी त्याला जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान वेदांतचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची इंदिरानगर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन मृत्यूची नोंद केली आहे.दरम्यान, हा 16 वर्षाचा होता आणि त्याच्याकडे वाहन चालवण्याचे लायसन्स नव्हते.असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यास देणे हा देखील गुन्हा आहे असे पोलीस म्हणाले. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहे. तर अल्पवयीन मुलांना गाडी न देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---