नाशिक लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२५ । कृषी मंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यात युरियाचा कोट्यावधींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर येत आहे. शेतीसाठी वापरला जाणारा ९० टन युरिया जप्त करण्यात आला असून हा पुरवठा पशुखाद्य तयार करण्यासाठी वापर केला जात होता. गोदरेज ऍग्रोवेट या खासगी कंपनीला हा युरिया पुरवल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे हा युरिया गाजियाबाद आणि कोलकत्ता येथून आला होता.
याप्रकरणी कृषी विभागाच्या अहवालानंतर दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनी संचालक युरिया पुरवठादार कंपन्या वाहतूकदार अशा सर्व नऊ जणांवर गुन्हे दाखल दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीमध्ये तपासणी केल्याने 50 किलो बागेतील युरियाची किंमत 24 ते 28 रुपये किलो असल्याचे लक्षात आल्याने औद्योगिक वापरासाठीचा युरिया नसून शेती वापराचा अनुदानित युरिया असल्याचे निदर्शनास आले. संबंधित कंपनीसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेती उपयुक्त युरिया या ठिकाणी वापरला जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.