---Advertisement---

नाशिक पोलिसांची सिंगम कारवाई: बांधकाम साईटवरून ८ बांगलादेशी घुसखोर पकडले..

nashik
---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत अवैधरीत्या भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अशातच नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या ८ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. शहरातल्या वेगवेगळ्या भागातून या बांगलादेशीं नागरिकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

एका बांधकाम साईटवर ६०० कामगार काम करत होते, त्यात काही बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मजूर आणि सुपरवायझरचं वेषांतर करून ४ दिवस त्याठिकाणी रेकी केली. बांगलादेशी नागरिक असल्याची खात्री झाल्यानंतर, पोलिसांनी छापा टाकून ८ बांगलादेशी नागरिकांना अटक केली.

अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांकडून बांगलादेशी दाखले मिळून आले आहेत. त्यापैकी एक बांगलादेशी नागरिक १२ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये आला होता. तीन बांगलादेशी नागरिकांकडे भारतीय कागदपत्रे आढळून आले आहेत, ज्यात आधार कार्ड आणि पॅनकार्ड सापडले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, केवळ पैसे कमावण्यासाठी ते भारतात आले होते आणि कमावलेले पैसे कलकत्त्यामधील बँकेतून बांगलादेशला पाठवत होते.

लेबर कॉन्ट्रॅक्टर मार्फत ते नाशिकात आले होते. या प्रकरणी ATS आणि सुरक्षा यंत्रणांना देखील कळवण्यात आलं आहे. यांना कुणी आश्रय दिला, कागदपत्रे कुणी तयार करून दिली? याची चौकशी सध्या सुरु आहे. अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडे सापडलेले कागदपत्रे आणि पत्ते नाशिक जिल्ह्यातील नाहीत, अन्य ठिकाणची आहेत.

आडगाव पोलीस ठाण्याअंतर्गत ही संपूर्ण कारवाई करण्यात आली आहे, असं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलं आहे. पोलीस उपनिरीक्षक यांनी सांगितलं की, अवैध घुसखोरी आणि बनावट कागदपत्रांप्रकरणी २ गुन्हे दाखल केले आहेत. अवैध घुसखोरी प्रकरणी ५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद तर बनावट कागदपत्रं प्रकरणी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणी ATS आणि अन्य यंत्रणांची मदत घेऊन तपास करणार आहोत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---