---Advertisement---

सटाण्याच्या व्यक्तीने सुशिक्षित बेरोजगारांना लावला ६२ लाखाचा चुना

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । जमिनीचा वाद मिटवून शासकीय नोकरीदेखील लावून देतो, असे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सटाण्याच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम फकिरा रुमणे (रा. चेहेडी खुर्द, ता. निफाड) यांनी फिर्याद दिली. रुमणे यांचा काही दिवसांपासून जमिनीचा वाद सुरू आहे.

संशयित आरोपी समाधान केवळराव जगताप (रा. चौगाव, ता. बागलाण) याने जमिनीचा वाद मिटवून देतो, असे सांगितले. त्यामुळे त्यांचा नेहमी एकमेकांशी संपर्क वाढला. फिर्यादी रुमणे यांचा मुलगा अक्षयसह इतर मुलांना सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. नोकरीसाठी काही पैसे लागतील, असे सांगून आरोपीने रुमणे यांचा मुलगा अक्षय व इतर मुलांना रक्कम जमा करण्यास सांगितले.

त्यानुसार सर्व बेरोजगार युवकांनी ६१ लाख ५९ हजार रुपये जमा करून ते आरोपीकडे दिले. त्याने ही रक्कम स्वीकारली व ती स्वतःच्या फायद्याकरिता वापरून बेरोजगारांची फसवणूक केली. सरकारवाडा पोलिस ठाण्यात समाधान जगतापविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---