---Advertisement---

नोकरीचे आमिष दाखवत ३ तरुणांना लावला १९ लाखांचा चुना ; फसवणुकीचा गुन्हा दाखल

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । देशभरात नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडविले जात आहे. असाच एक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे. ज्यात शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाला विक्रीकर आणि पीडब्ल्यूडी विभागात जागा असल्याचे सांगून मंत्रालयातून थेट नियुक्तीचे आमिष दाखवत ३ तरुणांकडून १९ लाखांची रक्कम घेत बोगस नियुक्तिपत्राद्वारे फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी महिला व तिच्या साथीदाराविरोधात अंबड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून माधुरी आभाळे, रोहिदास आभाळे अशी या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि प्रशांत सूर्यवंशी (रा. खुटवडनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०२३ मध्ये संशयित माधुरी आभाळे यांना मी शासकीय नोकरीच्या शोधात असल्याचे माहिती होते. संशयित महिलेने संपर्क साधून प्रत्यक्ष भेट घेत ‘विक्रीकर विभागात असिस्टंट कमिशनरची जागा आहे. २० लाखांमध्ये थेट नियुक्तिपत्र मिळेल’, असे सांगितले सूर्यवंशी यांनी नकार दिला, मात्र संशयित महिलेने रोहिदास आभाळे याच्यासोबत बोलणे करून दिले. संशयित आभाळेने मी मंत्रालयात स्वीय सहायक आहे. ‘२० लाख रुपये द्या, मी ऑर्डर करून देतो’, असे सांगितले. सूर्यवंशी यांना विश्वास बसल्याने तडजोडीअंती १५ लाख ठरले.

सुरुवातील १० लाख आणि ऑर्डर मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्यात येणार होती. दोन दिवसांनी संशयित महिलेने सूर्यवंशी यांना ‘पीडब्ल्यूडी विभागात जागा आहे, कुणी उमेदवार असेल तर सांगा’ असे सांगितले. त्यावर सूर्यवंशी यांनी त्यांच्या तीन मित्रांना सांगितले. त्यांनी प्रत्येकी ३ लाखप्रमाणे नऊ लाख दिले. ऑर्डर मिळणार म्हणून चारही मित्र आनंदात होते. दोन महिने वाट पाहिली, मात्र संशयितांनी आचारसंहितेचे कारण देत वेळ मारून नेली. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर नोकरीसाठी तगादा लावला असता संशयित वेगवेगळे कारण सांगू लागले. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पैशांची मागणी केली असता संशयित महिलेने सूर्यवंशी यांच्या मोबाइलवर बोगस नियुक्तिपत्र पाठवले. मात्र, त्यावर कधी जॉइन होणार याची तारीख नव्हती. सूर्यवंशी यांनी हा प्रकार मित्रांना सांगितला. त्यांनी महिलेकडे पैशांची मागणी केली. महिलेने ३ मित्रांनाही मोबाइलवर नियुक्ती पत्र पाठवत नोकरी पक्की असून कार्यालयाकडून लवकरच नियुक्ती मिळेल, असा विश्वास दाखवला. मात्र, त्यांना आभाळ दाम्पत्याने गंडा घातला.

बोगस नियुक्तिपत्राचा खेळ
सूर्यवंशीसह त्यांच्या मित्रांनी पीडब्ल्यूडीमध्ये चौकशी केली असता आभाळे यांनी दिलेले नियुक्तिपत्र बोगस असल्याचे समजले. यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी अंबडचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे तपास करत आहेत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---