---Advertisement---

काँग्रेसला पुन्हा धक्का; ३ वेळा आमदार राहिलेला नेता शिवसेनेत प्रवेश करणार

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२५ । ठाकरे गटातील अनेक नेते पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला असल्याच्या बातम्या समोर आले. आता यानंतर काँग्रेसमधील नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली. पुण्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर आता काँग्रेसला मराठवाड्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. मराठवाड्यातील काँग्रेसचा बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे.

शिंदे गट ‘मिशन टायगर’च्या माध्यमातून महाविकास आघाडीला एकापाठोपाठ एक धक्के देत आहे. आता पुन्हा एकदा शिवसेनेनं मराठवाड्यात काँग्रेसला दुसरा धक्का दिला आहे. हिंगोली विधानसभेत काँग्रेसकडून सलग ३ वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे नेते भाऊराव पाटील गोरेगावकर आपल्या हजारो समर्थकांसह शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. लवकरच हिंगोलीमध्ये गोरेगावकर यांचा पक्षप्रवेश सोहळा देखील पार पडणार असल्याची माहिती शिवसेनेसह गोरेगावकरांच्या समर्थकांनी दिली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला स्वतः एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून भाऊराव पाटील गोरेगावकर यांची उमेदवारी निश्चित झाली असताना अचानक उद्धव ठाकरेंनी हिंगोली विधानसभेची जागा सोडून घेत रूपाली पाटील गोरेगावकरांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली होती. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या गोरेगावकर यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. मात्र या निवडणुकीत रूपाली पाटील गोरेगावकरांसह भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा देखील पराभव झाला होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---