नाशिक लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२५ । १ ऑगस्ट २०२५ पासून, अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, जे तुमच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतात. यामध्ये क्रेडिट कार्ड, UPI, LPG, CNG, बँक सुट्ट्या आणि विमान इंधनाच्या किमतींचा समावेश आहे. हे बदल आधीच जाणून घेणे महत्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे बजेट नियोजन करू शकाल आणि पुढील महिन्यात होणारा कोणताही आर्थिक त्रास टाळू शकाल.
क्रेडिट कार्डमध्ये बदल
जर तुमच्याकडे SBI Card असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. या कार्डधारकांना मोठा झटका मिळार आहे. ११ ऑगस्टपासून एसबीआय को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवर मिळणारे फ्रि एअर अपघात इन्श्युरन्स कव्हर बंद करणार आहे. त्यामुळे त्यांना इन्श्युरन्स मिळणार नाहीये.
ATF च्या किंमती
१ ऑगस्टपासून एयर टर्बाइन फ्लूल (ATF)च्या किंमतीतदेखील बदल होऊ शकतो. इंडियन ऑइल कंपन्या फक्त एलपीजी गॅस नव्हे तर ATF च्या किंमतीतही बदल करतात.
UPI नियमांमध्ये बदल
१ ऑगस्टपासून यूपीआयच्या नियमांत बदल केले जाणार आहे. आता तुम्ही दिवसाला फक्त ५० वेळा बॅलेंस चेक करु शकतात. मोबाईल नंबरवरुन लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये दिवसाला फक्त २५ वेळा बॅलेंस चेक करु शकतात. Autopay ट्रान्झॅक्शन आता फक्त ३ वेळेच्या स्लॉटमध्ये प्रोसेस होणार आहे. सकाळी १० वाजताच्या आधी, दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत आणि रात्री ९.३० नंतर तुमचे Autopay ट्रान्झॅक्शन होणार आहे. तसेच फेल झालेल्या ट्रान्झॅक्शनचा स्टेट दिवसातून फक्त ३ वेळा चेक करु शकतात.
CNG, PNG च्या किंमतीत बदल
तेल कंपन्या दर महिन्याला सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत बदल करतात. एप्रिलनंतर या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आता सहा महिन्यांनी कदाचित CNG, PNG च्या दरात बदल होऊ शकतो.
LPG गॅसच्या किंमती
दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होतात. १ जुलै रोजीदेखील व्यावसायिक गॅसच्या किंमतीत बदल झाला होता. आता १ ऑगस्ट रोजीदेखील गॅसच्या किंमती बदलणार आहे. या किंमती वाढतात की कमी होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
बँकेच्या सुट्ट्या
रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये बँका जवळपास १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद असणार आहेत.