---Advertisement---

10वी परीक्षेचा निकाल जाहीर ; कोणता विभाग अव्वल?

---Advertisement---

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल अखेर आज लागला आहे. महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत राज्याच्या निकालाबाबत माहिती दिली. त्यानुसार राज्याचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट वर पालकांना आणि मुलांना निकाल पाहता येईल.

यंदा दहावीसाठी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी पास झाले. यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१० टक्के इतकी आहे. तर २८ हजार १२ खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २२ हजार ५१८ विद्यार्थी पास झाले. तसेच ९ हजार ६७३ दिव्यांग विद्यार्थी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ५८५ विद्यार्थी बसले. यातील ८ हजार ८४८ पास झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२.२७ टक्के इतका लागला आहे, असे शरद गोसावी यांनी म्हटले.

यंदाच्या परीक्षेत कोकण विभागाने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. या विभागाचा निकाल तब्बल ९८.२८ टक्के इतका नोंदवला आहे. तर, दुसरीकडे नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ९०.७८ टक्के इतका लागला आहे.

विभाग निहाय निकाल

पुणे – 94.89
नागपूर – 90.78
छत्रपती संभाजीनगर – 92.82
मुंबई -95.84
कोल्हापूर – 96.87
अमरावती – 92.95
नाशिक – 93.04
लातूर – 92.77
कोकण – 98.82

विद्यार्थी खालील अधिकृत वेबसाइट्सवर आपला निकाल पाहू शकतात:
mahresult.nic.in
mahahsscboard.in
ssc.mahresults.org.in
sscresult.mkcl.org
maharashtraeducation.net

निकाल कसा पाहायचा?
वरीलपैकी कोणत्याही वेबसाइटवर जा.
“SSC Result 2025” लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव (हॉल तिकीटवर नमूद केल्यानुसार) टाका.
“View Result” बटणावर क्लिक करा.
निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट काढून ठेवा.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---