---Advertisement---

ह्रदयद्रावक ! नाशिकमध्ये पाण्याच्या बादलीत बुडून १० महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

---Advertisement---

नाशिक लाईव्ह न्यूज । ६ जून २०२५ । नाशिकरोडच्या रोकडोबावाडी परिसरात एक ह्रदयद्रावक घटना घडली. ज्यात १० महिन्यांच्या चिमुकल्याचा पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. रोशन अजय तायडे असं मयत चिमुकल्याचे नाव असून पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिकरोडच्या रोकडोबावाडी परिसरात चिमुकला आपल्या आईसोबत वास्तव्यास असून चिमुकला रोशन हा घराबाहेरील अंगणात खेळत होता. तर त्याची आई स्वंयपाकघरात स्वंयपाक करत होती. काही वेळानंतर बाळाचा आवाज न आल्यावर तिने शोधाशोध केली. तेव्हा चिमुकला बादलीत बुडालेल्या अवस्थेत आढळला.

चिमुकल्याला बुडालेल्या अवस्थेत पाहुन आईने हंबरडा फोडला. बाळाला तात्काळ बिटको रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना संपूर्ण परिसराला हादरवणारी असून, रोकडोबावाडी मशिदीजवळील रहिवाशांमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---